प्रकरण ९

शेवटचा दिवस, आणि 'फिर मिलेंगे'

पार्क मीडोज आणि मायदेशाचे वेध

अमेरिकेतला शेवटचा दिवस (परतीचं विमान ५ ऑक्टोबर, रात्री ८:२५)

चिपोटलेच्या शोधात

अमेरिकेतला शेवटचा दिवस. 🌹🙏

आज बाहेरच जेवायचं ठरलं होतं. प्रज्ञाला चिपोटले (Chipotle) ही मेक्सिकन शाकाहारी डिश काय असते ते पाहायचं होतं. म्हणून आम्ही डेन्व्हर परिसरातल्या प्रसिद्ध पार्क मीडोज (Park Meadows) फूड मॉल-कम-शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गेलो.

ऑर्डर काय करायची, हे आम्हाला कळणार नाही म्हणून मुलानेच स्वतः ऑर्डर दिली. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे तोच सगळं घेऊन आला, प्रज्ञासाठी शाकाहारी चिपोटले, आणि मला व त्याला चिकन सँडविच, सोबत थम्सअप.

आपल्याला जेवताना थम्सअपसारखं काही प्यायची सवय नसते; पण अमेरिकन जेवण हाय प्रोटीन आणि पचायला जड असल्यामुळे सोबत ते पितात.

आपल्यात आणि त्यांच्यात

एक डिश म्हणजे आपण भारतीय पूर्ण संपवूच शकत नाही इतकी मोठी असते. पण अमेरिकन लोक लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती सहज संपवत होते. त्यांच्या आणि आपल्या शरीरयष्टीतला हाच फरक! कदाचित तिथलं भौगोलिक वातावरणही त्याला कारणीभूत असेल.

जेवण झाल्यावर आपला टेबल आपणच स्वच्छ करायचा, हा इथला अलिखित नियम होता. फूड मॉलमध्ये कोणीही कोणत्याही टेबलवर बसून खाऊ-पिऊ शकतो, त्यामुळे पुढच्या माणसासाठी टेबल स्वच्छ करून देणं हे आपलं कर्तव्य असतं. शिल्लक राहिलेले पदार्थ घरी नेता येत नाहीत; बाहेरच्या कचराकुंडीतच टाकणं अनिवार्य असतं.

हिऱ्यांचा, घड्याळांचा मॉल

जेवणानंतर मॉलमध्ये फिरायला सुरुवात केली. मॉल बराच मोठा होता, आणि थकवा जाणवू लागला होता. सोन्याची, हिऱ्यांची, कपड्यांची, रोलेक्सपासून इतर महागड्या घड्याळांची, खेळण्यांची, देशोदेशीची वेगवेगळी दुकानं होती.

मुलाने सांगितलं की इथल्या स्वारोव्स्कीच्या (Swarovski) दुकानातूनच वेडिंग रिंग घ्यावी, असं प्रत्येक अमेरिकन मुला-मुलीचं स्वप्न असतं.

सगळा मॉल बघणं शक्यच नव्हतं. थकून मॉलच्या बाहेर आराम करण्यासाठी असलेल्या जागी थोडा वेळ बसलो आणि घराकडे निघालो. आता भारतात जायची तयारी करायची होती, बॅगा भरणं, वजन करणं, ते जिकिरीचं काम बाकी होतं. 🙏

पार्क मीडोज मॉलमध्ये फिरल्यानंतर बाहेर मोकळ्या हवेत आराम करताना बाबा आणि आई.
पार्क मीडोज मॉलच्या भव्य अंतर्गत दालनातून (Dillard's) फेरफटका मारताना.

मायदेशाचे वेध

आता मायदेशी, भारतात परतायचे वेध लागले होते. आई कशी असेल? बाकीचे सगळे कसे असतील? मित्र-मैत्रिणी काय करत असतील?, असे विचार राहून राहून येत होते.

आमचं ५ ऑक्टोबरचं तुर्किश एअरलाइन्सचं विमान रात्री ८ वाजून २५ मिनिटांचं होतं. मुलगा गेट पास घेऊन विमानाच्या गेटपर्यंत सोडायला आला होता. त्याला "फिर मिलेंगे" म्हणत निरोप दिला. 🌹

अमेरिकेतील अविस्मरणीय आठवणी घेऊन मायदेशी परतण्यासाठी विमानातून घेतलेला निरोप.

समारोप

धन्य ती अमेरिका! 🙏

THANKS TO अमेरिका 🙏

THANKS to my son 🌹🙏

निवडक छायाचित्रे

प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात घालवलेले निवांत क्षण.
अमेरिकेच्या या अविस्मरणीय प्रवासाची गोड सांगता.

सर्व प्रकरणांकडे परत