प्रकरण ७

एकाच छताखाली सगळे देव

घरापासून पंधरा मिनिटांवरचं मंदिर

सप्टेंबर २०२६ (दिनांक अज्ञात)

डेन्व्हर परिसरातलं हिंदू टेंपल अँड कल्चरल सेंटर ऑफ द रॉकीज (Hindu Temple and Cultural Center of the Rockies) आमच्या घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. त्याची वेळ सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशी होती.

हिंदू मंदिरात (Hindu Temple & Cultural Center) शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेली श्री गणेशाची पूजा आणि महाआरती.

आपल्याकडे जसं एखाद्या मंदिरात एकच देवी किंवा एकच देव असतो, तसं इथे नव्हतं. लक्ष्मी-विष्णू, बालाजी, कृष्ण, राम-लक्ष्मण-सीता, हनुमान, गणपती, सगळे देव एकाच ठिकाणी होते. त्या त्या देवांचे सणवार, उत्सव अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने साजरे केले जातात.

देवाला प्रसाद म्हणून प्रत्येकजण काही ना काही घेऊन आलेला होता, जिलेबी, सफरचंद, लाडू, बर्फी... थोडंथोडकं नाही, भरपूर! येणाऱ्या प्रत्येक भक्ताला, ज्यांना हवा असेल त्यांना, चहा वगैरे दिलं जातं.

वातावरण अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न होतं. गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकजण शिस्तीत, रांगेने दर्शन घेत होता. एक-दोन तास कसे निघून गेले, ते समजलंच नाही. 👏

निवडक छायाचित्रे

"हिंदू टेम्पल ऑफ रॉकीज"मध्ये बसून हनुमान चालीसा वाचताना बाबा.
गाडीतून अमेरिकन हायवे आणि तिथली शिस्तबद्ध वाहतूक दाखवणारा व्हिडिओ.

सर्व प्रकरणांकडे परत