प्रकरण ४

दोन बातम्या

सातासमुद्रापार भारतातून आलेल्या

१९–२० सप्टेंबर २०२६

१९ सप्टेंबरला एक दुःखद बातमी आली, माझा जिवलग मित्र, जवळचा नातलग यांचं अचानक निधन झालं.

मन सुन्न झालं. तो दिवस अस्वस्थतेतच गेला. 🙏

दुसऱ्याच दिवशी, २० सप्टेंबरला, आणखी एक बातमी आली, हॉस्पिटलमधले आमचे "नाना" यांचं निधन झालं.

नाना म्हणजे आमच्या चार पिढ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार. आजोबांचे अतिशय विश्वासू, आणि आमच्या घरातलेच एक. 🌹🙏

असो. काळ कोणासाठी थांबत नाही.

दोन-तीन दिवस असेच गेले. बाहेर वातावरण खराबच होतं, अतिशय थंड, कोरडे वारे वाहत होते; घरी राहणंच योग्य होतं.

निवडक छायाचित्रे

अमेरिकेतील "एच मार्ट" या आशियाई ग्रोसरी स्टोअरमधील माशांचे दालन; भारतात वहिनींना अमेरिकेतील मासळी बाजार कसा असतो हे दाखवण्यासाठी काढलेला फोटो.
एच मार्ट स्टोअरमधील पाण्याच्या टाकीत ठेवलेले जिवंत खेकडे.

सर्व प्रकरणांकडे परत